दिग्रस वरून एम.एच.२९ टी.२२७७ या १४ चाकी ट्रक मधून जप्त केलेला तांदूळ छाबडा स्टिम इंडस्ट्रीज ब्रहम्हापूरी जिल्हा चंद्रपुर येथे जात होता.दरम्यान आर्णी पोलीस रात्री दरम्यान गस्त वर असताना तांदूळाने भरलेल्या ट्रकवर संशय आल्याने त्याची तपासणी केली.तपासणी दरम्यान तो तांदूळ राशन दुकानातील असल्याचे लक्षात आल्याने ठाणेदार पितांबर जाधव यांनी तांदूळाने भरलेला ट्रक ताब्यात घेतला.
दिग्रस येथील दलाल चा तांदूळ
आर्णी पोलीसांनी जप्त केलेला २४० क्विंटल तांदूळ हा दिग्रस येथील दिलीप जानुसिंग पवार यांच्या मालकीचा असून पोलीसांनी तपास केल्यास सत्य लवकरच समोर येईल.पवार कडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ कशा आणि कुठून आला याचा सुध्दा तपास होणे गरजेचे आहे.
बोरगांव रोड वरील बालाजी जिंनिग मध्ये ट्रक मधील तांदूळ खाली करण्यात आले,त्यात सहा ते सात पोत्यावर भारतीय खाद्य निगम लिहून असलेले तांदूळाचे पोते आढळून आले.त्यामुळे जप्त केलेला २४० टन तांदूळ हा रास्त भाव धान्य दुकानातील असल्याचे सिद्ध होते.मात्र या प्रकरणी महसुल विभागाने हात वर केल्याने घटनेची फिर्याद उशीरा पर्यंत पोलिसात न दिल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.
