मनिष पाटील यांचा पत्ता कट कोणी केलं?

मनिष पाटील यांचा पत्ता कट कोणी केलं?
यवतमाळ मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष,उपाध्यक्ष पद निवड सोमवारी करण्यात आली.मात्र राजकारणात मोठा दबदबा असलेले माजी खासदार स्व. उत्तमराव पाटील यांचे चिरंजीव तथा मध्यवर्ती बॅंकेचे माजी अध्यक्ष आणि नवनिर्वाचित संचालक मनिष पाटील यांचा अध्यक्ष पदाचा पत्ता कोणी कट केला अशी चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात  सुरू आहे.

सुरूवाती पासूनच मनिष पाटील यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सर्वात आघाडी वर होतं.अगदी शेवटच्या बैठकी पर्यंत पाटील बॅकेचे अध्यक्ष होणार असे चित्र असताना ऐनवेळेवर पत्ता कट झाल्याने पाटील गटात प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे.माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या कडून मनिष पाटील यांचा नाव अध्यक्ष पदासाठी रेटून धरण्यात आले होतो.


ऐनवेळेवर खासदार बाळू धानोरकर आणि काॅग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी मनिष पाटील यांच्या नावाला विरोध केल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याची माहिती काॅग्रेस मधून पुढे येत आहे. बॅंकेच्या कामकाजाचा अनेक वर्षाचा मनिष पाटील यांना अनुभव आहे.त्यातच राजकीय क्षेत्रात पाटील कुटूंबीयांची जिल्ह्यात वेगळी ओळख देखील आहे.त्यामुळे पाटील यांच्या वर प्रेम करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे मनिष पाटील यांना अध्यक्ष करणं गरजेचे होतं.मात्र काॅग्रेस मधील अंतर्गत वाद आणि त्यात गेलेला बळी म्हणजेच मनिष पाटील अशीही चर्चा सुरू आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने