नऊ जणांनी घेतला भगवा खंद्यावर
यवतमाळ: दोन दिवसापुर्वी यवतमाळ मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आलेल्या संजय देरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी दुपारी एक वाजता दरम्यान मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवास्थानी शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केलं.
मुख्यमंत्र्यांनी दिली शाबासकी
यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने पराग पिंगळे,विश्वास नांदेकर आणि राजेंद्र गायकवाड यांनी मोठी मेहनत घेतली आहे.त्याच फळ म्हणुन संजय दरेकर सह आठ जणांनी शिवसेनेत प्रवेश केलं.त्यामुळे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांना शाबासकी दिल्याची माहिती आहे.
यवतमाळ मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष पदी वर्णी लागल्या नंतर संजय देरकर यांनी शिवसेनेत दाखल झाले.त्यांच्या बरोबर वणीचे बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर, लुकेश्वर बोबडे,लतीफ खान,रिजवान खान,विठ्ठल बोंडे,राजु लडके,कुर्लीचे सोसायटीचे उपाध्यक्ष प्रितम बोबडे आणि सुशील मुथा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी खुद उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलं.दरम्यान यावेळी राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर,पराग पिंगळे,राजेंद्र गायकवाड आणि माजी जिल्हाप्रमुख हरीहर लिगंनवार हजर होते.

