सर्जेराव गायकवाड यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करताना जयंत पाटील
सांगली: जिल्ह्यातील जत-शेगाव रस्त्यावर एका सराफा दुकानदाराला लुटून दरोडेखोरांनी चार किलो ५३० ग्राम वजानाचे सोने लुटल्याची घटना घडली.तद्नंतर केवळ चोवीस तासात चोरीचा छडा लावत घटनेतील आरोपींना अटक केल्याची धडक कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी केली.त्यामुळे प्रजासत्ताक दिना निमित्त राज्याचे जलसंपदा तथा जिल्हाचे पालकमंत्री जयंत पाटील,जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांच्या हस्ते सर्जेराव गायकवाड यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ म्हणुन पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांची राज्यात ओळख आहे.विशेष म्हणजे विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन यवतमाळ ची ओळख आहे.यवतमाळ जिल्ह्यात सन २०१४ साली गायकवाड पोलीस निरीक्षक म्हणुन कर्तव्य बजावत असताना त्यांनी अनेक मोठे गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला खाकीतील जिवाभाचा अधिकारी म्हणुन सर्जेराव गायकवाड यांची ओळख आहे.
यवतमाळ मध्ये पोलीस निरीक्षक असताना एका प्रकरणात बड्या नेत्याला गायकवाड यांनी भर रस्त्यावर कायद्याची शिकवण दिली होती.त्यामुळे सर्जेराव गायकवाड हे नाव आजही यवतमाळ जिल्हातील राजकीय नेत्यांच्या ओठांवर कायम आहे.दि.२६ जानेवारी रोजी सांगली येथे प्रजासत्ताक दिना निमित्त स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी जत पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडलेल्या दरोड्यातील आरोपींना चोवीस तासात हवालत मध्ये टाकुन चार आरोपी सह २ कोटी २६ लाख रूपयेचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणल्या बदल त्यांचा सन्मान करण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response