यवतमाळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामांचे प्रस्ताव यवतमाळ नगर पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहे. या कामांना अजुनही मंजुरात न मिळाल्याने आता जवळपास 57 कामांचा 11 कोटी 50 लाख रुपयांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. अत्यंत गंभीर असलेल्या या विषयाकडे भाजपा नेते नगरसेवक प्रा.डॉ. प्रविण प्रजापती यांनी जिल्हाधिका-यांचे लक्ष वेधले असून तातडीने या कामांना मंजुरात देण्याची मागणी केली आहे.
निधीच नसल्याने अडचण
कोरोना संकटामुळे विविध विकास कामांचा निधी मिळाला नाही. दोन वर्षासाठी खासदारांचा तसेच सन 2019-20 चा आमदारांचा निधी मिळाला नाही. आता मंजुरात न मिळाल्याने अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत साडे अकरा कोटीचा निधी सुध्दा परत जाण्याची शकयता आहे. प्रत्तेक काम वेळेत पुर्ण करण्याचे नियम असतांनाही प्रशासकीय यंत्रना आपली जबाबदारी पुर्ण करतांना दिसून येत नाही. त्यामुळे मी या प्रकरणाकडे जिल्हाधिका-यांचे लक्ष वेधले आहे.
यवतमाळ नगर परीषदेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत विविध विकास कामांचे प्रस्ताव तयार केले आहे. या कामांना नगर परिषदेमधील सर्वसाधारण सभा दिनांक ३० जानेवारी २०१७ चे ठराव क्र. १५ व दिनांक २९ जुन २०१९ चे ठराव क्र. ९ अन्वये मान्यता प्राप्त झाली आहे. सदरच्या कामांना कार्यकारी अभियंता, म.जि.प्रा. यवतमाळ या विभागाची सुध्दा तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार सदरच्या कामाचा प्रस्ताव यवतमाळ नगर परीषदेने प्रशासकिय मान्यतेसाठी दिनांक १५ ऑक्टोंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. या विविध विकासात्मक प्रस्तावा अंतर्गत एकुण ५७ विकास कामांचे जवळपास ११ कोटी ५१ लाख ३३ हजार ६३४ रुपये किंमत असलेले प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले आहे.
परंतु अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे या प्रस्तावावर मंजुरीकरिता योग्य ती उचीत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे भाजपा नेते प्रा.डॉ. प्रविण प्रजापती यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन त्यांचे सदर प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्र सरकारद्वारे जारी झालेल्या परिपञकानुसार मार्च २०२१ पर्यंत सदरचा निधी खर्च करता येणार आहे. त्यामुळे उर्वरीत दोन महिण्यामध्ये या विकास कामांची निविदा प्रक्रिया करून त्यास सभागृहासमोर ठेवून त्याला अंतीम मंजुरात घेवून सदरच्या कामांचे कियान्वयन करणे हे फार जिकरीचे आहे. त्यामुळे या कामांना तातडीने मंजुरात देण्याची मागणी प्रा.डॉ. प्रविण प्रजापती यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिका-यांना केली आहे.
