शैला मिर्झापुरे
यवतमाळ : भारतीय जनता पार्टी,यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार मदन येरावार यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून,विविध क्षेञातील कलावंतांचा, "यवतमाळ रत्न 2021" ने सन्मान करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने नाॅमिनेशनसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
7218205344 या संपर्क नंबर संपर्क करावे.असे भाजपाचे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रघुवीरसिंह चौहान यांनी कळविले आहे.
उपरोक्त कार्यक्रम भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात होणार असून, संगीत, डान्स, क्रीडा,योगा, साहित्य, किर्तन, चित्रकला, व इतर कलेत पारंगत असलेल्या, यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत कलाकार कलावंतांनी, दि. १५ व १६ जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ वाजतादरम्यान, आपापल्या कागद पत्रासह, यवतमाळच्या पुनम चौकातील, भाजपाच्या जिल्हा कार्यलायात उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा सचिव शैला मिर्जापुरे यांनी केले आहे.
