जिल्ह्यात अद्यापही रेतीघाटाचा लिलावा झाला नाही.परिनामी स्थानिक पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांसोबत तडजोड करून खुलेआम अवैध रेती तस्करी सुरू आहे.यातच काही दिवसा पुर्वी जिल्हाधिकारी यांच्या चमूने पाच तालुक्यात गोपनीय पद्धतीने पाहणी करून रेती तस्करी बाबत आवाहल सादर केल्याने त्यात पाच तहसीलदार आणि दोन एसडीओ जिल्हाधिकाऱ्यांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या चमूने पाच दिवसा आधी ही पाहणी केली.त्यात वणी येथे तहसीलदार आणि एसडीओ यांना रेती व कोळसा करिता लाखो रूपये महिन्याला देत असल्याचे समजते. पांढरकवडा येथे अवैध रेती तस्करी करण्यासाठी पाच घाटाचे तब्बल १० लाख रूपये महिना देण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
घाटंजीचा तो कंजूम कोण?
घाटंजी येथील कंजूम नावाचा व्यक्ती हा तब्बल पाच लाख रूपये तहसीलदार यांना देऊन रेती तस्करी करित असल्याची माहिती नुकताच समोर आल्याने महसुल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.घाटंजीचा तो कंजूम कोण अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.
उमरखेड येथे तर मोठे साहेब खुप कडक आहेत.असे सांगुन एसडीओ आणि तहसीलदार यांनी अवैध रेती माफियां कडून महिन्याला लाखो रूपये घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.महागांव येथील अवैध रेती माफिया सुध्दा रेती तस्करी करण्यात पुढे असून दर महिन्याला लाखो रूपये संबंधित अधिकाऱ्यांना देत असल्याची माहिती आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या रडारवर पाच तहसीलदार आणि दोन एसडीओ असल्याचे समजते.उमरखेडचे तहसीलदार या आधी ते बाभुळगांव येथे कार्यरत असताना मोठ्या प्रमाणात अवैध रेती झाली होती.मात्र उमरखेड मध्ये तहसीलदार म्हणुन रूजू झाल्या नंतर त्यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून चक्क खाजगी चालक ठेवून त्यांच्या माध्यमातून रेती तस्करीचा व्यवहार सुरू असल्याची माहिती आहे.
