नांदेड - बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डाॅ. रामराव बापू महाराज यांचे नुकतेच निधन झाले असून त्यानिमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली चा कार्यक्रम नांदेड उत्तर मतदार संघातील जगदंबा मंदिर व सेवालाल महाराज मंदिर समितीकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी डााॅ. रामराव बापू महाराज यांचे मंदिर उभारणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
बंजारा समाजाचे संत डाॅ. रामराव बापू महाराज यांनी अनेक कार्य समाजाप्रती केले आहेत. त्यांचा आदर सर्वांना आहे. सर्वांचे भक्ती स्थळ हे संत रामराव बापू महाराज आहेत. त्यांचे भव्यदिव्य मंदिर नांदेड उत्तर मतदारसंघांमध्ये उभारले पाहिजे आणि ते मी उभारणार असल्याचे आश्वासन उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी श्रद्धांजली कार्यक्रमात समाजाला दिले आहे. यावेळी समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासमोर समस्या मांडल्या, त्या समस्या लवकरात लवकर सोडणार असल्याचे आश्वासन आ. बालाजी कल्याणकर यांनी दिले आहे. नांदेड उत्तर मतदार संघातील जगदंबा मंदिर व सेवालाल मंदिर समितीकडून श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. तेथेच मंदिर उभारणार असल्याचे कल्याणकर यांनी सांगितले आहे.यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील, डॉ. मोहन चव्हाण, प्रकाश राठोड, प्रा. डी. आर. पवार, शोभा राणी चव्हाण, नीताताई राठोड, अमरसींग राठोड, नकुल चव्हाण, सचिन राठोड, राजू सिंग, निरंजन राठोड, करण सिंग, रंजीत जाधव यांच्या सहसमाजातील अनेक बांधव उपस्थित होते.
