Breaking

Post Top Ad

गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

ट्रक पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यु

ट्रक पलटी झाल्याने एकाचा जागीच मृत्यु
सुनिल चव्हाणहिवरा सं(महागांव) नागपुर तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावर काऊरवाडी ते  हिवरा (संगम) दरम्यान असलेल्या उडान पुला नजीक ऊस  खाली करुन येणारा  ट्रक पलटी होऊन १४ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला असुन एक जण गंभीर जखमी झाला आहे.

दि.१२ नोव्हेंबर च्या दुपारी  दरम्यान  ऊस कारखान्या वरुन  खाली करुन येणारा  ट्रक एम. एच. ०४ पी. २८६५ या वाहनाला अपघात झाला. हा अपघात एवढा गंभीर होता, की ट्रकवर मदत म्हनुण काम करणारा कीरण राठोड या १४ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यु झाला.


यामध्ये ट्रक चालक गेमसिंग राठोड हा गंभीर जखमी झाला.आपघातग्रस्त दोघेही उमरखेड तालुक्यातील पार्डी येथील असल्याचे समजते.घटनास्थळी महागाव पोलीस व राष्ट्रीय महामार्ग पोलीसानी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad