दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटना दि.११ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान घडली.कु.देविका संतोष मुरखे रा.खेमकुंड असे त्या निरपराध मुलीचे नाव आहे.
वडकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना अशी की, मृतक मुलीचे वडील संतोष नारायण मुरखे आणि या प्रकरणातील संशयित आरोप बाळू मारेगामा यांचे घरगुती वाद सुरू होता.याच वादातून संशयित आरोपीची पत्नी घर सोडून गेली असल्याने त्यावरून मनात राग धरून बुधवारी दुपारी दरम्यान संशयित आरोपीने मृतक मुलीचे वडील संतोष ला मारहाण करण्यासाठी गेला असता घरी संतोष मिळाला नाही,त्यामुळे संशयित आरोपीने संतोषच्या चिमुकल्या मुलीवर राग काढत धारदार कटरने सापासप वार करून गळा चिरून हत्या केली.
