Breaking

Post Top Ad

बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

बिहार : तेजस्वी यादव चे तेज जिंकले !

बिहार : तेजस्वी यादव चे तेज जिंकले !
एक्झिट पोल चे सारे अंदाज खोटे ठरवत

बिहार विधानसभा निवडणूकीत भाजप ने बाजी मारली असली तरी मतदारांचा कौल लक्षात घेता भाजपला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण असे की जगातील सर्वाधिक सभासद असलेला आणि भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष असलेला भाजप बिहार विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवू शकत नाही हे स्पष्ट झाले.इतकेच कशाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही भाजप  जवळ नसल्याने जदयू च्या नितीश कुमारांना नेतृत्व देऊन त्यांच्या हाताखाली काम करणे भाजपला भाग पडले आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  जदयूचे नितीश कुमार अशा अनुभवी नेत्यांसमोर पहिल्यांदाच निवडणुकीच्या आखाड्यात दंड ठोकून उभे झालेल्या राष्ट्रीय जनता दल अर्थात राजद च्या तेजस्वी यादव यांनी या दोन्ही पहिलवानांना घाम फोडला. मोदी - नितीश यांची तारिफ करण्याबरोबरच तेजस्वी यादव याचा देखील अभिनंदन केले. पाहिजे मजबूत विरोधीपक्ष असला पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीतही तेजस्वी यादव यांनी पराक्रम केला तो नक्कीच कौतुकास्पद आहे. यासंदर्भात शरद पवार यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. जगातील मोठी लोकशाही म्हणून अमेरिकेला ओळखले जाते. निवडणुकीचा निकाल काहीही लागू शकतो. निवडणूक जिंकता आली नाही म्हणून नाउमेद व्हायचे नसते.


बिहार मध्ये  युवा सरकार येणार, क्रांतीचे वारे वाहणार अशी  चर्चा या एक्झिट पोल मुळे सुरू झाली होती. पण प्रत्यक्ष निकाल हाती आले तेव्हा भारतीय जनता पक्षाने बिहार मधेच नव्हे तर दहा राज्यात झालेल्या ५८ जागांच्या पोटनिवडणुकीत  सुद्धा विक्रमी विजय संपादन केला आहे. अपेक्षेपेक्षा वेगळाच निकाल लागल्यामुळे अनेक लोक नेते ईव्हीएम मधील घोटाळ्यामुळे भाजप चे बहुमत आल्याचा आरोप करीत आहेत.काँग्रेस नेते राज यांनी मतदान यंत्रावर शंका उपस्थित केली होती.


यंत्राच्या विश्वासार्हतेला बाबत काही नेत्यांनी शंका उपस्थित केल्यावर सदर यंत्राच्या मतमोजणी ही समस्या निर्माण झालेली नाही, तसेच ही यंत्रे निर्दोष असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयुक्त सुदीप जैन यांनी केले आहे.त्यात किती दम आहे. हा प्रश्न वेगळा. केंद्रातील भाजपसरकार आणि बिहारातील नितीशकुमार सरकार कोरोना महामारीशी सामना करण्यात सरकार अपयशी  ठरले, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला, प्रवासी मजूर यांची घरवापसी आणि लाखो लोकांच्या गेलेल्या नोकऱ्या व बंद पडलेले उद्योग धंदे असे जीवन-मरणाचे सर्व मुद्दे घेऊन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला करणाऱ्या काँग्रेसला बिहार मध्ये जनतेने दणका दिला तसा १० राज्यातील जातील ५८  विधानसभेच्या पोट निवडणुकीतही दणका दिला आहे.कांॅग्रेसचे बिहार निवडणुकीत प्रदर्शन चिंताजनकच राहिले आहे .गुजरात पोटनिवडणुकीत भाजपाने आठही जागा काबीज केल्या आहे तर कर्नाटकात दोन्ही जागा मिळवल्या आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसचे २५ आमदार सोडून भाजपात गेले होते.

भाजपने १६ जागी विजय प्राप्त केला आहे.अजित जोगी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी काँग्रेसने बाजी मारली मात्र कर्नाटक राज्यात दोन्ही जागा भाजपने काबीज केल्या आहेत कर्नाटक, तेलंगणा, मणिपूर व नागालँड मे सुद्धा काँग्रेसला चा सामना करावा. झारखंड च्या दोन जागा पैकी एक झारखंड मुक्ती मोर्चा आणि एक काँग्रेसला  मिळाली. दोन्ही ठिकाणी भाजप उमेदवाराची हार झाली.


राजकीय विश्लेषक सुरेंद्र गंगण यांनी म्हटले आहे की  तेजस्वी यादव कदाचित सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले असतील पण लोकांनी त्यांना पूर्णपणे नाकारलेले नाही. त्यांचा पराभव झाला तरी त्यांची वाढलेली ताकद बरेच काही सांगू जात आहे. भविष्यात पक्षाला चांगले दिवस असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी जेडीयूला एक प्रकारे इशारा मिळाला आहे. त्यामुळे बिहारचे आगामी राजकारण वेगळे असलण्याची चिन्हे आहेत.


तेजस्वी यादव यांच्या पक्ष आरजेडीने बिहारमध्ये १४४ जागा लढवल्या आणि ७५ जागा जिंकल्या. बिहारमधील आरजेडी सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. या राजकीय पक्षाला २३ टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. निवडणुकीत तेजस्वी यादव फक्त राजदच नव्हे तर महागठबंधनचा सर्वात मोठा चेहरा बनला. तेच रणनितीकार होते.निवडणुकीत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते आपल्या मुद्द्यांवर भरकटलेले नाही तर ते आपल्याच मुद्द्यांवर शेवटपर्यंत ठाम राहिले. तेजस्वी यांनी बिहारमधील बेरोजगारीला मोठा मुद्दा बनविला. जंगल राज आणि यादव कुटुंब या मुद्द्यांवर एनडीए हल्ला करेल, हे तेजस्वी यांना ठाऊक होते, म्हणूनच त्यांनी अशा निवडणुकीची रणनीती तयार केली जेणेकरून या मुद्द्यांवर विरोधकांना बोलता येऊ शकत नाही. लालू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे निवडणुकीत हा मुद्दा होऊ नये तसेच लालू यादव आणि राबडीदेवी यांच्यामाध्यमातून टीका होऊ नये, म्हणून त्यांनी निवडणूक पोस्टर्समध्ये त्यांना स्थान दिले नव्हते. एवढेच नाही तर तेजस्वी यांच्या भाषणाची शैली आणि लोकांशी संवाद साधण्याची पद्धतही लोकांना आवडली होती.तेजस्वीने लालूंशिवाय लढवली ही सर्वात कठीण लढाई हे मान्य केले पाहिजे.

न. मा. जोशी - ८८०५९४८९५१

२०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान  काॅंग्रेसच्या कथित भ्रष्टाचाराची  लक्तरे चव्हाट्यावर धुत जनतेला 'अच्छे दिन' चे स्वप्न दाखवत भ्रष्टाचार मुक्त भारताचे आश्वासन देत  भाजप नेते नरेंद्र मोदी सत्तेत आले. ८ नोवेंबर २०१६ ला मोदींनी नोटाबंदी केली. नंतर जीएसटी लावली. दोन्ही निर्णय सपशेल फसले आणि देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडेच  मोडले तरीही मोदींची लोकप्रियता मात्र कमी झाली नव्हती.२०१९ च्या निवडणुकीत अनेक ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवल्यावरही मोदींनी लोकप्रियतेची

घसरगुंडी अनुभवली नाही.

जगभर कोरोना चा कहर पसरत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणणे , देशभर कोरोनाच्या भस्मासूराने थैमान घालणे असे प्रकार होऊनही मोदीं ची लोकप्रियता घसरगुंडीवर आली नाही 

असे भाजपला वाटत आहे.मात्र वास्तव काही वेगळेअसल्याचे आता दिसत आहे.

३०३ च्या बहुमता मुळे भाजप स्वतःला बिनधास्त समजत असला तरी एनडीए'मधून मित्र पक्ष ज्याप्रकारे बाहेर पडत आहेत  ते पाहता हे शुभ संकेत नाहीत.  

महाराष्ट्रात भाजपला दणका देत सेनेच्या उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करून  स्वतः सत्ता स्थापन केली . मोदींच्या तीन कृषी कायद्यांमुळे संतप्त झालेल्या अकाली दलाने एनडीए पासून फारकत घेतली. बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर लोजपाने एनडीए ला सोडले.काही महिन्यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. तिथेही भाजपला जोरदार दणका बसला आहे .गोरखा जनमुक्ती मोर्चा .(जी जे एम) एनडीए पासून वेगळा झाला .जी जे एम चे प्रमुख बिमल गुरुंग  यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसशी आघाडी केली आहे. सोशल मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची  लोकप्रियता घसरगुंडीला लागली आहे. लाईक्स पेक्षा डिसलाईक्स ची संख्या जास्त दिसत आहे‌. या साऱ्या घटना  भाजपने आत्मपरीक्षण करावे हा संदेश देत आहेत.

लेखक हे जेष्ठ पत्रकार असून राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad