आर्णी(यवतमाळ) शुक्रवारी दि.१३ नोव्हेंबर पासून 'दिवाळी' या सणाला सुरूवात होत असताना एका संसाराची राखरांगोळी झाल्याची घटना 'धनत्रयोदिशीच्या' पूर्व पहाटेला घडली.आर्णी तालुक्यातील भंडारी(शिवर) येथील ३५ वर्षाचा सुनिल श्रीराम जाधव असे विघुत शाॅक लागुन मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
मृतक सुनिल जाधव यांनी अरूणावती नदी वरून शेतात सिंचना साठी पाण्याची मोटार लावली होती.अशात पाईप बदलण्यासाठी नदीत उतरलेल्या सुनिल ला विघुत चा जोरदार शाॅक लागला.त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.मृतक ला उपचारासाठी आर्णी येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले.मृतक सुनिल जाधव याला दोन मुलं आहेत.