यवतमाळ : टोल प्लाझासाठी भारत सरकारच्या दि.१४ जुलै २०२० च्या नोटीफीकेशन द्वारे टोलचे दर निश्चित केलेले आहेत. भांब (राजा) टोलवरून ज्या वाहनांना टोल वसुलीमधून सुट आहे, त्यामध्ये खाजगी वाहनांचा समावेश नाही. त्याकारणाने सदर खाजगी वाहनांना टोलमधून सुट देण्यात आलेली नाही.
तसेच टोल वरून जाणाऱ्या वाहनांना फास्ट टॅग लावणे अनिवार्य असतांना काही वाहनाला प्रत्यक्ष फास्ट टॅग लावण्यात आलेला नाही. करीता ते टोलमधून सुट मिळण्यास अपात्र आहेत, असे राष्ट्रीय महामार्गचे परियोजना निर्देशक प्रशांत मेंढे यांनी कळविले आहे.
