यवतमाळ: येथील चार ते पाच जणांनी एक युवकावर शुल्लक कारणा वरून पाठीमागुन चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री सात वाजता दरम्यान घडली.दरम्यान जखमी झालेल्या युवकाला काही जणांनी तातडीने वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.
यवतमाळ येथील चार ते पाच जण भांब राजा आणि हिवरीच्या मधात आणि राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या धाब्यावर जेवन करण्यासाठी आले होते.यावेळी शुल्लक कारणावरून वाद झाला.घडलेल्या घटनेची तक्रार देण्यासाठी पवन प्रभारकर सोननंकर हा जात असताना किन्ही जवळ त्या चार ते पाच जणांनानी पवन ला अडवून चाकूने सापासप पाठी मागुन वार केले.त्यामुळे पवन हा गंभीर जखमी झाला.त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.उशीरा पर्यंत घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली नव्हती.
