यवतमाळ पोलीस अधिक्षक पदांची सूत्र हाती घेतल्या नंतर नवे एसपी डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी अवैध धंद्दे सह 'भाईगिरी' खपवून घेणार नसल्याचा इशारा दिल्या नंतर दोनच हत्यात 'खाकीवर्दी'ची झलक दाखवायला सुरूवात केली.याची एक झलक म्हणुन आर्णीत काही महिन्या पूर्वी वाढदिवसा निमित्त केक कापण्यासाठी वापरलेल्या दोन तलवारी भंगाराच्या दुकानातून स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी सह कर्मचाऱ्यांनी जप्त करून आरोपीला अटक केल्याची माहिती पुढे आली आहे.
आर्णी येथील प्रेमनगर म्हणजे गुन्हेगारीचा अड्डा,याच परिसरातून खऱ्या अर्थाने भाई(दादा) याची निर्मिती होते.काही महिन्यांपूर्वी वाढदिवसाचा केक कापण्यासाठी वापरण्यात आलेली तलवार सह सोशल मिडीयावर याचा फोटो व्हायरल झाला होता.मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ दिलीप भुजबळ पाटील यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी सह कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन तलवार सह आरोपी शेख जावेद,शेख मिजाज याला अटक करण्यात आले.
प्रेमनगर परिसरातील 'न्यू भंगार' या दुकानातून यवतमाळ गुन्हे शाखेचे दुय्यम पोलीस निरीक्षक सचिन पवार,गजानन डोंगरे,किशोर भेंडेकर,किशन भगत यांनी हि कारवाई यशस्वी पार पाडली. सध्या दुर्गात्सव सुरू आहे.त्या अनुषंगाने कुठेही अप्रिय घटना घडू नये या करिता पोलीस प्रशासन जागृत आहे.घातक शस्त्र दुकान असल्याची माहिती पोलीस अधिक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला मिळत असेल तर नक्कीच पोलीस विभाग जागृत आहे,अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
