काही महिन्यांपूर्वी एका 'राष्ट्रवादी'च्या नगरसेवकांच्या वाढदिवसा निमित्त केक कापण्यासाठी दोन तलवारी वापरण्या आल्या होत्या.त्याचे फोटो देखील समाज माध्यमांवर धुमाकूळ घालत होते.असे असताना 'त्या' राष्ट्रवादी च्या नगरसेवकाला तलवार जप्त प्रकरणात आरोपी का करण्यात आले नाही अशी चर्चा या निमित्ताने आर्णीकरांमध्ये सुरू आहे.
राष्ट्रवादी-काॅग्रेस नेते पोलीस स्टेशन
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत दोन तलवार आणि एका आरोपी ला अटक केल्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले.पोलीस स्टेशन मध्ये राष्ट्रवादी आणि काॅग्रेसचे अनेक नगरसेवक कशासाठी हजर होते? त्या नगरसेवकाला वाचविण्यासाठी तर हजर नव्हते ना अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
बुधवारी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत दोन तलवारी जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली.मात्र बुधवारी दुपारी बायपास वर राष्ट्रवादी चा नगरसेवक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासोबत कशासाठी सोबत होता,अशी चर्चा शोसल मिडीया वर सुरू आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी आर्णीतील गावगुंड चा कायमाचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने तलवार प्रकरणात जातीने लक्ष घालून अजून किती जण यात मोकाट आहे हे शोधून काढले पाहीजे अशी मागणी होत आहे.
