मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाॅलिवूड मधील कलाकारांचे नाते अगदी जीवाभावाचे होते.ते सर्वांना माहितीच आहे.कलाकारांना जेव्हा-जेव्हा अडचणी आल्या तेव्हा तेव्हा ते कलाकार मंडळी बाळासाहेब ठाकरे यांचे निवास्थान असलेल्या मातोश्री चा दरवाजा त्यांनी ठोठावला आणि बाळासाहेबांनी अडचणीत सापडलेल्या कालकारांना मायेची ममता देत सही सलामत बाहेर काढल्याचे अनेक उदाहरणं आहेत.त्यामुळे बाॅलिवूड आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील संबंध अगदी जवळचे होते.अभिनेते मुकेश खन्ना यांनी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केल्याने बाळासाहेबांची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.
महाभारत आणि शक्तीमान या दोन्ही सिरिअरल मध्ये भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत मुकेश खन्ना यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये खन्ना बाळासाहेबांच्या भेटी विषयी सांगत आहेत. बाळासाहेब हयात असते तर मुंबईत आज जे काही चुकीचं घडतंय ते घडलंच नसतं, असं मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे.
मुंबई-महाराष्ट्र सह देशात हिंदुत्वासोबत ज्यांचं नाव जोडलं गेलं, त्या हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज आठवण येत असल्याचं मुकेश खन्ना यांनी म्हटले आहे. संपूर्ण आयुष्यात शिवसेनाप्रमुखांना मला भेटण्याचा योग एकदाच आला, पण ती भेट अविस्मरणीय ठरली. मुंबईत बाळासाहेबांना पाहूनच लहानाचा मोठा झालो. मुंबईचा विकास पाहिला. मुंबईवर ज्यांचं वजन होतं. त्यांच्या नावाचा दरारा होता. एक प्रकारे महाराष्ट्रासह देशावर त्यांचा कंट्रोल होता. त्यांना खुर्ची किंवा सत्तेची हाव कधीही नव्हती. पण त्यांच्या शब्दाला मान होता.
मुंबईत शिवसेनेने बंद घोषित केला की, बाळासाहेबांची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, ते म्हणायचे गर्वानं सांगा की, मी हिंदू आहे. आपण हिंदू असल्याची सांगायला आज अनेकांना लाज वाटते. बाळासाहेब असते, तर ही परिस्थिती काही वेगळी असती. धर्मावरून मतभेद झाले नसते. तसंच, आज बाळासाहेबांची प्रचंड आठवण येतेय. ते असते तर हे सर्व घडलं नसतं. मुंबई बाळासाहेबांना खूप मीस करतेय, असं मुकेश यांनी व्हिडिओच्या शेवटी म्हटलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response