Breaking

Post Top Ad

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

जिल्ह्याची वाटचाल 'कोरोना मुक्त' कडे: नव्याने ४३ जण पॉझिटीव्ह

जिल्ह्याची वाटचाल 'कोरोना मुक्त' कडे: नव्याने ४३ जण पॉझिटीव्ह

यवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी  चोवीस तासात ४३ जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये वणी शहरातील ५९ वर्षीय आणि दारव्हा तालुक्यातील ६३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ४३ जणांमध्ये पुरुष २८ व महिला १५ आहेत. यात यवतमाळ शहरातील  पुरुष १९ व महिला १३, पुसद तालुक्यातील दोन पुरुष, आर्णी शहरातील एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील दोन पुरुष, दिग्रस तालुक्यातील एक महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, घाटंजी शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष, कळंब तालुक्यातील एक पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत २१८ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८७२६ झाली आहे.  जिल्ह्यात २७२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २५६ जण भरती आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad