आर्णी(यवतमाळ) पोलीस स्टेशन पासून हक्केच्या अंतरावर असलेल्या देऊरवाडी बुटले येथे दोन वर्षा आधीचे शेतात सरकी टोपण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला त्यांचा मोबदला न दिल्याने वयोवृद्ध महिलेचा नायलाॅनच्या दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री दरम्यान उघडकीस आली.
पोलीसांनी दि.२ ऑक्टोबर च्या रात्री साडे दहा वाजता खुनाचा गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.सदर घटना दि.३० सप्टेंबर च्या दुपारी दरम्यान घडली.यावेळी अल्पवयीन मुलाने मजुरीच्या जुन्या पैशा वरून वाद घालून सिंधू चौधरी हिचा दोरीने गळा दाबून खून केले.दरम्यान खून केल्या नंतर मृतक महिलेला शेतातील बाजूच्या नाल्यात नेऊन त्यावर गवत टाकून.मृतक सिंधू बाई घरी न आल्याने किसन भाऊराव चौधरी याने माझी काकू बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती.त्यामुळे त्या अल्पवयीन मुला विरोधात पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.