Breaking

Post Top Ad

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

'तीन मजली इमारत कोसळली'

 

'तीन मजली इमारत कोसळली'

(छायाचित्र एएनआय)

गुजरात राज्यातील बडोदे या शहरात मंगळवारी मध्ये रात्री दरम्यान 'तीन' मजली इमारत कोसळल्याची घटना घडली.या घटनेत तीन कामगारांचे जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच अग्न्रीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत त्वरीत बचाव कार्याला सुरुवात केली.कोसळलेल्या इमारती च्या ढिगाऱ्या खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात मधील बडोद्यातील बावानानपूरा परिसरात मंगळवारी मध्यरात्री दरम्यान तीन मजली इमारतीचे काम सुरू होते.मात्र इमारत एका बाजूला झुकली आणि काही वेळात 'ती' इमारत कोसळली त्यामुळे यात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण ढिगाऱ्या खाली अडकून पडल्याची माहिती आहे.मृत्यू चा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात असून अजून किती जण ढिगाऱ्या खाली अडकून पडले आहे,याची माहिती पुढे आलेली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad