गेल्या मार्च महिन्या पासून बंद असलेल्या चित्रपट गृह,नाटकगृह,बार आणि रेस्टॉरंट आता गुरूवार पासून काही अटी वर सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.५० टक्के क्षमतेने बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यात येणार असून यात चित्रपटगृह आणि सिंगल स्क्रिन गृह,नाट्यगृह सुरू होणार आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय मुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.
दि.१ ऑक्टोबर रोज गुरूवार पासून राज्यातील चित्रपटगृह,बार, रेस्टॉरंट आणि नाट्यगृह काही अटी वर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे या क्षेत्रातील लोकांना दिलासा मिळाला आहे.दरम्यान या सिनेमा गृह,बार,रेस्टॉरंट आणि नाटकगृह यात सोशल डिस्टन्सिंग आणि शासन व प्रशासनाचे सर्व नियमांचे पालन करूनच परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. ज्या ठिकाणी नियमांचे पालन होणार नाही,अशा चालक-मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.