यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तसेच मृत्युच्या संख्येत वाढ दररोज वाढ होत असली तरी आतापर्यंत ५० हजारांच्या वर नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आता पर्यंत एकूण ५०८४४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असून यात विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळेतील (व्हीआरडीएल) २८५४७ नमुने आणि रॅपीड ॲन्टीजन टेस्ट किटद्वारे २२२९७ नमुने निगेटिव्ह आहेत.
आर्णी मध्ये कोरोनाची प्रस्थितीत चिंताजनक
आर्णी या शहरात दिवसभरात १३ पुरूष आणि आठ महिला आणि ग्रामीण भागात एक जण असे मिळून एकुण २२ जण पाॅझिटिव्ह असल्याची माहिती आहे.
आज दि.१० सप्टेंबर ला दिवसभरात जिल्ह्यात सहा कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मात्र पुन्हा १५१ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले १०८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तीन तालुक्याचा आढावा
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची तसेच मृत्युच्या आकड्यांची वाढ लक्षात घेता यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी तीन तालुक्यांचा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन आढावा घेतला. तसेच मृत्यु होऊ न देण्यासाठी आपापल्या तालुक्यात गांभिर्याने सर्व्हे करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केळापूरसह घाटंजी आणि झरी जामणी तालुक्याचा येथील नगर परिषदेच्या सभागृहात आढावा घेतला.
मृत झालेल्या सहा जणांमध्ये यवतमाळ शहरातील ६३ वर्षीय पुरुष, ६५ आणि ७५ वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ५० वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच गत दिवसभरात नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १५१ जणांमध्ये पुरुष ९४ तर ५७ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील पुरुष २९ व १२ महिला, घाटंजी शहरातील एक पुरूष, घाटंजी तालुक्यातील दोन पुरूष, आर्णी शहरातील १३ पुरूष व आठ महिला,आर्णी तालुक्यातील एक महिला, बाभुळगाव शहरातील चार पुरूष व पाच महिला, दारव्हा तालुक्यातील दोन पुरूष व दोन महिला, दिग्रस शहरातील चार पुरूष व दोन महिला, कळंब शहरातील तीन पुरूष व तीन महिला, केळापुर तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील आठ पुरूष व दोन महिला, महागाव तालुक्यातील एक पुरूष, मारेगाव शहरातील चार पुरूष व दोन महिला, नेर शहरातील सहा पुरूष व पाच महिला, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील आठ पुरूष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, उमरखेड शहरातील चार पुरूष व पाच महिला, उमरखेड तालुक्यातील एक पुरूष तसेच यवतमाळ तालुक्यातील एक पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १०६३ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्ण असून होम आयसोलेशनमध्ये २६० जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४८२० झाली आहे. यापैकी ३३६४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १३३ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात ३३८ जण भरती आहे.

