यवतमाळ : मंगळवार ला जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून १९४ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील ७० वर्षीय पुरुष व ५८ वर्षीय महिला, वणी शहरातील ७० वर्षीय महिला, पुसद येथील ६४ वर्षीय पुरुष, महागाव शहरातील ३० वर्षीय पुरुष, बाभुळगाव शहरातील ६५ वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील ६३ वर्षीय पुरुष आणि आर्णि तालुक्यातील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७४७१३ नमुने पाठविले असून यापैकी ७३६९० प्राप्त तर १०२३ अप्राप्त आहेत. तसेच ६५२२० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
मंगळवार ला नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १९४ जणांमध्ये पुरुष १२७ व ६७ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ४९ पुरुष व २१ महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील २८ पुरुष व १५ महिला, पांढरकवडा तालुक्यातील दोन पुरुष, पुसद शहरातील १८ पुरुष व नऊ महिला, आर्णी शहरातील सात पुरुष व दोन महिला, आर्णी तालुक्यातील एक महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, महागाव तालुक्यातील तीन पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील चार पुरुष व पाच महिला, वणी तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात २२८ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८४७९ झाली आहे. यापैकी कालपर्यंत ६९६७ जण बरे झाले होते. आज बरे होऊन सुट्टी देणा-यांची संख्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही, असे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्युंची संख्या २६२ झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७५ जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड व सारी रुग्णांची माहिती संबंधितांना पुरविण्याकरीता वैद्यकीय समाजसेवक अधिक्षक यांची वार्डनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांसोबत दूरध्वनीवरून बोलणे तसेच रुग्णांची माहिती देण्यात येणार आहे.
'कोविड रूग्णांसाठी रूग्णालयातर्फे मोबाईल यादी'
कोविड व सारी रुग्णांसोबत नातेवाईकांचे बोलणे करून देण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ तसेच रुग्णांची माहिती प्राप्त करून घेण्याकरीता दुपारी ३ ते ५ ही वेळ आरक्षित करण्यात आली आहे. वार्ड क्रमांक १८, १९, २४ व २५ मधील रुग्णांची माहिती इमले (मो. 9767360666), खडसे (मो. 8975040623), विलगीकरण कक्षातील (आयसोलेशन वॉर्ड) रुग्णांची माहिती पिसे ( मो. 8482851208) व श्री. निचळे (मो. 9404775806) या क्रमांकावर, अतिविशेषोपचार रुग्णालयातील रुग्णांची माहिती जानकर (मो. 9420021208) व दुंगे (मो. 9850406505) या क्रमांकावर तर तापरुग्ण ओपीडी रुग्णांची माहिती उभाळे (मो.9923485432) या क्रमांकावर उपलब्ध होईल. कोविड मृत्यू संबंधात इमले यांच्या 9767360666 व श्री. खडसे यांच्या 8975040623 यावर संपर्क साधावा, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे.