Breaking

Post Top Ad

बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक:११७ जण पॉझिटीव्ह

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक:११७ जण पॉझिटीव्ह

(संग्रहित दृश्य)

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचा दिवसं दिवस उद्रेक सुरू आहे. अशात आज दि.९ सप्टेंबर रोजी तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. तर ११७ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले ७३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


मृत झालेल्या तीन जणांमध्ये आर्णी तालुक्यातील ५० वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील २४ वर्षीय पुरुष आणि दिग्रस शहरातील ६० वर्षीय पुरुष आहे. तर नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या ११७ जणांमध्ये पुरुष ७५ असून ४२ महिलांचा समावेश आहे. यात आर्णी शहरातील दोन पुरुष व दोन महिला,  दिग्रस शहरातील नऊ पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील एक महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष व चार महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, महागाव शहरातील एक महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, नेर शहरातील सात पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, पुसद तालुक्यातील तीन पुरुष, राळेगाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड तालुक्यातील दोन पुरुष, वणी शहरातील १० पुरुष व १३ महिला, यवतमाळ शहरातील ३४ पुरुष व १३ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात ९६६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह असून होम आयसोलेशनमध्ये ३१५ जण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ४६६४ झाली आहे. यापैकी ३२५५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १२७ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २८४ जण भरती आहे.

महाराष्ट्र24 चा अॅप लवकर तुमच्या भेटीला....!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad