जिल्ह्यात मृत्यू सह पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे.त्या अनुषंगाने सर्वांनी या महामारी आजार पासून दुर राहण्याच्या दृष्टिकोनातून शासन व प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मृत झालेल्या ११ जणांमध्ये यवतमाळ शहरातील ७२ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरूष, ७५ वर्षीय पुरूष, ५२ वर्षीय पुरूष व ६० वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ५७ वर्षीय पुरूष, आर्णी शहरातील ६५ वर्षीय पुरुष, आर्णी तालुक्यातील ५५ वर्षीय पुरूष, महागाव तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील ६० वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील ६२ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६३९६४ नमुने पाठविले असून यापैकी ६२७३३ प्राप्त तर १२३१ अप्राप्त आहेत. तसेच ५६३४० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
आज दि.१६ सप्टेंबर रोजी नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या २४० जणांमध्ये १४० पुरुष १४० आणि महिला १०० आहेत. यात आर्णी शहरातील दोन पुरुष व दोन महिला, बाभूळगाव शहरातील १२ पुरुष व पाच महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन पुरूष, दिग्रस शहरातील सात पुरूष व सहा महिला, घाटंजी शहरातील आठ पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील तीन पुरूष व सहा महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील दोन पुरुष व सात महिला, महागाव तालुक्यातील दोन पुरूष, मारेगाव शहरातील चार पुरुष व तीन महिला, नेर शहरातील सात पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील १० पुरूष व १० महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, वणी शहरातील २८ पुरुष व २३ महिला, वणी तालुक्यातील दोन पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील ४१ पुरुष व २९ महिला, तसेच यवतमाळ तालुक्यातील एक महिलेचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात १६०३ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २२४ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ६३९३ झाली आहे. यापैकी ४३९१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १७५ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २८१ जण भरती आहे.
