Breaking

Post Top Ad

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२०

१२२ जण पुन्हा पाॅझिटिव्ह तर २२९ जणांना सुट्टी


१२२ जण पुन्हा पाॅझिटिव्ह तर २२९ जणांना सुट्टी

यवतमाळ सह सोहळाही तालुक्यात कोरोनाचे रूग्ण पाॅझिटिव्ह आढळून   येत आहे. पुसद, दिग्रस, महागांव, पांढरकवडा या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात निघाल्याने आता पर्यंत हजारो रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे सर्वांची जवाबदारी वाढल्याने कोरोना थांबवण्यासाठी नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या २२९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना आज शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी पुन्हा जिल्ह्यात १२२ नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे.


नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १२२ जणांमध्ये महिला ४२ आणि ८० पुरूष आहेत. यवतमाळ शहरातील मधिल २७ पुरुष व २१ महिला, कळंब शहरातील एक पुरूष, महागाव शहरातील १० पुरुष व एक महिला, पुसद शहरातील चार पुरुष, पांढरकवडा शहरातील सात पुरुष, आर्णी तालुक्यातील पाच पुरुष व तीन महिला, घाटंजी शहरातील एक पुरूष व एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील चार पुरूष व एक महिला, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष व चार महिला, वणी तालुक्यातील १० पुरुष व सहा महिला, दिग्रस तालुक्यातील आठ पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी २४ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४६५९३ नमुने पाठविले असून यापैकी ४५२०४ प्राप्त तर १३८९ अप्राप्त आहेत. तसेच ४२२०८३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२३ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर १०४ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ३१२१ झाली आहे. यापैकी २२१९ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ७५ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १८२ जण भरती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad