यवतमाळ मध्ये तीन कोरोना रूग्णांचा मृत्यू

यवतमाळ मध्ये तीन कोरोना रूग्णांचा मृत्यू

यवतमाळ जिल्हात आज तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने एकूण मृत्युंची संख्या २० झाली आहे. तसेच जिल्ह्यात २२ जण नव्याने  पॉझेटिव्ह आले आहेत. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले २२ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ९७२८ नमुने पाठविले असून यापैकी ९४६६ प्राप्त तर २६२ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात ८८८६ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात तीन मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील तारपुरा येथील ५५ वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील ३९ वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा शहरातील मशीद वॉर्ड येथील ३९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या २२ जणांमध्ये १० पुरुष आणि १२ महिला आहे. यात यवतमाळ शहरातील साई नगर येथील एक पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, शास्त्री नगर येथील एक पुरुष आणि दिग्रस येथील एक पुरुष, कळंब तालुक्यातील जोडमोह येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील चोंडी येथील एक महिला, पुसद शहरातील राम नगर येथील तीन पुरुष व चार महिला, पुसद शहरातील गणेश वॉर्ड येथील एक महिला, उमरखेड येथील तीन महिला, दारव्हा तालुक्यातील मानकोपरा येथील एक पुरुष, वणी शहरातील एक महिला व एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात रविवारपर्यंत १५९ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते.  नव्याने २२ पॉझेटिव्ह आले व बरे झालेल्या २२ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने हा आकडा १५९ वर स्थिरावला. मात्र तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात १५६ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे ९३ तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले ६३ जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५०८ झाली आहे. यापैकी ४०४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात २० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १०१ जण भरती आहे.


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने