Breaking

Post Top Ad

मंगळवार, २१ जुलै, २०२०

कोरोनावर लस बनवण्यात 'हा देश' सर्वात पुढे

कोरोनावर लस बनवण्यात 'हा देश' सर्वात पुढे
चीनने जगाला आदंण म्हणुन दिलेल्या कोरोना कोविड १९ मुळे संपुर्ण जगातील लोकं भयभीत झाले आहे. दिवसं-दिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू ची सुध्दा वाढत चालली आहे. त्यामुळे लस बनवण्यासाठी अनेक देशाने प्रयत्न चालवला आहे. लस च्या बनवण्यात कोण बाजी मारणार या कडे जगाचे लक्ष लागले आहे.
कोरोना वर भारत लस यशस्वीपणे लस तयार करणार असून येत्या काही दिवसात या लस उपचारासाठी उपलब्ध होणार आहे. येत्या १५ ऑगस्ट ला या बाबत देशातील जनतेला सुखद बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.
नुकताच मनुष्यांवरील चाचणीत ऑक्सफर्डची लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. या बाबत कोरोना व्हायरस विरूद्ध लढ्यात ब्रिटनमधून आनंदाची बातमी देत ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस मनुष्यांवरील चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्यात यशस्वी ठरल्याची माहिती आहे. सध्या १५५ वैक्सीन वर काम सुरू आहे. त्या पैकी २३ वैक्सीन (Human Trial) सुरू आहे. 

भारतात कोरोना वर लस बनवण्याचे काम वेगात सुरू असून लवकरच कोरोना वर उपचार म्हणुन भारत लस तयार करण्यासाठी कामाला लागला आहे. यामध्ये पहिल्या टप्यात १८ ते ५५ या वयोगटातील लोकांवर लस चा प्रयोग करण्यात येणार आहे. हि लस दिल्ली येथील आय.सी.एम. आर. आणि एन.आय.व्ही. या दोन्ही संस्थांनी काम सुरू केले आहे.

'रशिया'ने सुध्दा कोरोना वर लस बनवल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील एम.आर.एन.ऐ.१२७३ या कंपणीने तीस हजार लोकांवर प्रयोग केले असून लस बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अमेरिका चे म्हणणे आहे. अमेरिका नंतर भारताचा नाव असून यात अमेरिका, रशिया, चीन आणि भारत या देशात कोरोना वर लस बनविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून भारत यात बाजी मारणार असल्याचे समोर आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad