Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ३ जुलै, २०२०

भाजपचा हा आमदार करतोय दररोज व्यायाम

भाजपचा हा आमदार करतोय दररोज व्यायाम
बाॅलिवूड मधिल अनेक कलाकार सह विविध क्षेत्रातातील हजारो नागरिक दररोज न चुकता व्यायाम करतात. मात्र ग्रामीण भागातील युवक मंडळी व्यायाम पासून आजही दुर राहत असल्याचे चित्र पाहायला मिळतात. व्यायाम केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. त्या अनुषंगाने दररोज व्यायाम केला पाहिजे असे आवाहन भाजपचे यवतमाळ जिल्हातील आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार डाॅ. संदीप धुर्वे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखाली अंतर्गत जीवन जगणाऱ्या व्यक्ती पासून तर टाटा बिरला पर्यंत सर्वांनीच मानसिक स्वस्थ राखण्यासाठी व्यायाम करणे अंत्यतं गरजेचे असते. त्यातच सध्या कोरोना मुळे देशासह जग हैराण झाला असताना आर्णी-केळापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार डाॅ.संदीप धुर्वे यांनी स्वतःचे जीम मध्ये व्यायाम करतांनाचे फोटो सार्वजनिक करून नागरिकांना दररोज व्यायाम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दररोज व्यायाम करणाऱ्यांची रोगप्रतिकार शक्ती नेहमी चांगली असते त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला यासारखे संसर्गजन्य रोगा पासून दुर ठेवता येते.
भाजपचे आमदार डाॅ.संदीप धुर्वे हे १९९२ साली यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात लेक्चर म्हणुन नोकरीला लागले. तेव्हा पासून धुर्वे यांना जीम मध्ये व्यायाम करण्याची सवय लागली. गेल्या २८ वर्षा पासून ते सतत सकाळ आणि संध्याकाळ एक- एक तास जीम मध्ये कसरत करतात. डाॅ. संदीप धुर्वे हे पहिल्यांदाच २००४ मध्ये केळापूर मतदारसंघांतून भाजप च्या चिन्हावर विधानसभेत आमदार म्हणुन निवडून आले. त्याआधी २००३ मध्ये घरीच त्यांनी जीम चे साहित्य बसवून कसरत करणे सुरू केले. कोरोना सारख्या संकटात नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन आमदार संदीप धुर्वे यांनी नागरिकांना दररोज व्यायाम करण्याचे आवाहन केले आहे.
कसरत किंबहुना व्यायाम हि मानवी शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा सगळ्यात मोठा नि:शुल्क मार्ग आहे. यासाठी जगातील कोणत्याच नागरिकांना जीम मध्ये किंवा महागड्या व्यायाम शाळेत जाण्याची गरज नाही. दररोज वेळ मिळेल त्या दरम्यान एक तास सकाळ- संध्याकाळ व्यायाम,कसरत किंवा जीम मध्ये जावून शरीर तंदुरुस्त ठेवता येते. त्याच अनुषंगाने आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार डाॅ.संदीप धुर्वे यांनी जीम मध्ये व्यायाम करित असल्याचे फोटो सोशल मिडियावर टाकुन नागरिकांना व्यायाम करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडिओ मध्ये आमदार डाॅ.संदीप धुर्वे यांनी काय आवाहन केलंय नक्की बघा
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास नक्की शेअर करा आणि महाराष्ट्र24 पेज लाईक करायला विसरू नका. तुम्ही आम्हाला तुमची माहिती या  themaharashtra24@gmail.com ईमेल आयडीवर पाठवू शकता.
अथवा व्हाॅट्सअप क्रमांक  9764273121 या वर सुध्दा पाठवू शकता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad