महाराष्ट्र24 अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात तब्बल तीस पेक्षा जास्त कलाकारांची चौकशी करण्यात आली असून अजून अनेक अभिनेत्री पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेता सुशांतसिंह याने मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी दि. १४ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली होती. तद्नंतर चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली असताना अजून एक अभिनेत्री पोलिसांच्या रडारवर असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या पंचवीस दिवसात तीस पेक्षा जास्त कलाकारांची चौकशी पोलिसांनी केली आहे.
'सुशांत'च्या अत्यंत जवळ असणाऱ्या अनेकांची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. यामध्ये खास करून अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर पोलिसांचे अधिक लक्ष असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे रिया चक्रवर्ती अजूनही पोलिंसांच्या रडारवर आहे. या आधी वांद्रे पोलिसांनी रियाची दहा तास चौकशी केली होती. त्या दरम्यान तिचा जबाब पोलिसांनी नोंदविला होता. सुशांत बाबत रियाला अनेक बाबी विचारण्यात आल्या होत्या. तद्नंतर सुध्दा रिया ची पोलिंसानी फोन वरून तसेच अनेक वेळा पोलिस स्टेशन मध्ये बोलावून चौकशी केली आहे.
रिया आणि सुशांत लग्न करणार होते?
सुशांत आणि रिया डिसेंबर २०२० मध्ये लग्न करणार होते अशी चर्चा आहे. तीन पैकी दोन कंपन्याचे मालक रिया आणि तिचा भाऊ असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीनेही पोलीस अधिक तपास करित आहे.
सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी पोलिस सर्व बाजूंनी चौकशी करित आहे. सर्व जबाब नोंदविल्या नंतर त्याचा निष्कर्ष आणि रियाने दिलेला जबाब याची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे अद्यापही अभिनेत्री रिया हिला पोलिसांनी क्लीनचिट दिलेली नाही. त्यामुळे रिया अजूनही पोलिंसांच्या रडारवर असल्याची माहिती आहे.