'विकास दुबेचा एन्काऊंन्टर'


'विकास दुबेचा एन्काऊंन्टर'
उत्तर प्रदेश मधील कानपूरात आठ पोलिंसांच्या हत्येचा आरोपी गॅगस्टर विकास दुबे चा एन्काऊंटर झाल्याची माहिती पुढे आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चार राज्यातील पोलीस ज्याला पकडू शकली नाही, त्याला गुरूवारी महाकालच्या गार्डने पकडून पोलिंसांच्या हवाले केले होते.

आठ पोलिंसांच्या क्रूरपणे हत्येच्या सहा दिवसा नंतर तब्बल बाराशे पन्नास किलोमीटर चा प्रवास करून उज्जैन येथील महाकाल मंदिरात गॅगस्टर विकास दुबे ला पकडण्यात आले होते. गुरूवारी रात्री उशीरा त्याला उत्तर प्रदेश पोलिसांचा विशेष पथक  कानपूर कडे नेत असताना  पोलिस ताफ्यातील एका वाहनचा अपघात झाला. यादरम्यान गॅगस्टर विकास दुबे पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केल्याने यात विकास दुबे चा एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे.

चौकशी मध्ये अनेक मोठे मासे गळाला लागले असते
आठ पोलिंसांच्या क्रूरपणे हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबेला उज्जैन मध्ये अटक करण्यात आले. त्यानंतर उत्तर प्रदेश कडे घेऊन पोलिस निघाले मात्र रात्री अपघात झाला अन् त्यात दुबे पळण्याचा प्रयत्न केल्याने त्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. मात्र विकास दुबे चा पोलीसांनी सखोल चौकाशी केली असती तर त्याला कोणाचा आर्शीवाद होता हे समोर आले असते. पोलीसांच्या चौकशी दरम्यान विकास दुबे च्या जबाब मधून अनेक मोठे मासे गळाला लागले असते मात्र तसे घडले नाही.
अपघात झाल्या नंतर गॅगस्टर विकास दुबे हा घटनास्थळा वरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चकमकीत पोलिसांनी दुबेला ठार केले. विकास दुबेचा मृतदेह रूग्णालयात नेण्यात आला असता डाॅक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केले. जे पोलिसांना हवं होत तेच झाल अशी चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

कुख्यात गुंड विकास दुबेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या नंतर विविध प्रश्नांना तोंड फुटले होते. गुरूवारी दुरदर्शन एका संपादकाने कुख्यात गुंड विकास दुबे संदर्भात विश्लेषण करताना म्हटले होते की, विकास दुबे मरायला भीती वाटते म्हणुन त्याने पोलिसा आणि मिडीया समोर शरणागती आला. विकास दुबे मरणार असं देखील त्यानं स्पष्ट सांगितलं होते. त्यामुळे अपघात हा एक नाटक होतं का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत केल्या जात आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने