Breaking

Post Top Ad

शनिवार, ११ जुलै, २०२०

अखेर "त्या" प्रश्नाचा शरद पवारांनी 'सामना'च्या मुलाखतीत दिलं उत्तर 

अखेर "त्या" प्रश्नाचा शरद पवारांनी 'सामना'च्या मुलाखतीत दिलं उत्तर 
गेल्या चार पाच दिवसा पासून शरद पवार यांच्या मुलाखातीची जोरदार चर्चा सुरू होती. शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामना चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवारांची मुलाखात घेतली आहे. मुलाखात प्रकाशीत होण्या आधी पासून या मुलाखातीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. शनिवारी ही मुलाखात वाचकांसाठी सामना मधून प्रकाशीत करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची हि मुलाखात दि. ११ ते १३ जुलै पर्यंत प्रकाशीत होणार आहे. दैनिक सामना ला शरद पवार यांची हि बहुतेक पहिलीच मुलाखात असावी.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्या पासून अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'सामना'च्या पहिल्याच मुलाखातीत दिला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे आपण हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल? या प्रश्नांचे उत्तर शरद पवार यांनी अगदी सोप्या भाषेत दिले आहे. शरद पवार यांनी म्हटले आहेत की, "आपण महाविकास आघाडी सरकारचे ना मी हेडमास्तर आहे, ना माझ्या कडे रिमोट कंट्रोल आहे. ठाकरे सरकार सक्षम आहे सरकार चालवायला असे उत्तर शरद पवार यांनी दिला आहे.
देशातील सर्वात जेष्ठ आणि अनुभवी नेते शरद पवार यांनी 'सामना'ला धडाकेबाज 'मॅरेथॉन' मुलाखात दिली. शरद पवार राजकारणात कोणती भूमिका घेतात, काय बोलतात याला नेहमीच महत्व मिळाले. या वेळी शरद पवार 'सामना'च्या माध्यमातून बोलले. ते मार्गदर्शक तितकेच खळबळ उडवणारे आहे. महाराष्ट्रातील 'ठाकरे सरकार'ला अजिबात धोका नाही! हे त्यांनी ठामपणे सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी सडेतोड उत्तरे दिली. सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहिती नाही, असा 'स्फोट' शरद पवार यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
सत्तेचा दर्प चालत नाही; लोक पराभव करतात! भाजपचा १०५ आमदाराचा आकडा आहे; त्यात शिवसेनेचा योगदान मोठे आहे! ठाकरे सरकारला केंद्र सरकारचे पाठबळ नसल्याचे शरद पवार यांनी ठणकाऊन सांगितले आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांनी या दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणी जागवत म्हणाले की, "मला जे बाळासाहेब ठाकरे माहित आहेत, त्याप्रमाणे बाळासाहेबांची सबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत होती"  असं सुध्दा पवार सांगायला विसरले नाही.
'बाळासाहेब ठाकरे यांचा काँग्रेसशी संघर्ष जरूर होता. पण तो कायमचाच संघर्ष होता, असं समजण्याचं कारण नाही. उलट बाळासाहेब ठाकरे हे असे एकमेव नेते होते की ज्यांनी आपल्या पक्षाच्या राजकीय भवितव्याची तमा न बाळगता इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला पाठिंबा दिला होता. संपूर्ण देश इंदिरा गांधी यांच्या विरोध असताना त्यांनी ही भूमिका घेतली होती. आमच्यासाठी तो धक्काच होता. एवढंच नव्हे तर निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे उमेदवार उभे करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. याचं कारण त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल तसा विद्वेष नव्हता. उद्धव ठाकरेही त्याच वाटेनं चालले आहेत,' असं पवार म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad