माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना भारतरत्न द्या; मनीष जाधव शेतकरी नेते

Vasantrao Naik
ज्या व्यक्तीच्या पावन पदस्पर्शाने ही महाराष्ट्राची मातृभूमी  पुणीत झाली असे हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतरावजी नाईक साहेब यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात यावे या उद्दात हेतूने विद्यमान विधानसभा सभापती नानाभाऊ पटोले यांनी स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांचे जन्मस्थळ गहुली ते दिल्ली असे स्वाक्षरी मोहीम अभियान तीन वर्षापूर्वी राबविले होती.

मध्यंतरी शिवसेना व भाजप प्रणित शासन राज्यात सत्तास्थानी होते तेव्हा या मागणीला विधायक पद्धतीने नाना भाऊंनी न्याय दिला आज ते सत्तेत असून त्यांनी कै वसंतराव नाईक साहेब यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भात विधानसभेमध्ये एक मताने महाआघाडी  शासनाच्या वतीने विधानसभेच्या सभागृहांमध्ये सर्वानुमते ठराव घेऊन हा ठराव केंद्र शासनाकडे  पाठवावा या मागणीला घेऊन आग्रही राहावे. 

अन्यथा ही मागणी केवळ राजकीय स्टंट तर नव्ह ती असा अशा प्रश्न सामान्य जनता वसंतराव नाईक यांचे वैचारिक अनुयायी यांना आल्याशिवाय राहणार नाही. कारण हेतूबद्दल शंका  निर्माण झाला आहे.  या विषयाला तीन वर्षात कधीही ही आपण प्रसारमाध्यमांसमोर पुनरूच्चार केलेला नाही की, हे स्वाक्षरी मोहीम कुठपर्यंत आलेली आहे व किती लोकांच्या स्वाक्षरी या मोहिमेमध्ये झालेली आहे.

त्यामुळे नानाभाऊ पटोले विधानसभा सभापती कार्यकर्ते यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी उपस्थित केला आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने