सध्या देशासह राज्यात कोरोना मुळे हाहाकार माजला आहे.त्यातच अंतिम वर्षाच्या परिक्षेवरून राज्यपाल विरूद्ध सरकार असा सामना रंगत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या वादात उडी घेत राज्यपालांना टोला लगावला आहे.
महामारी चा संकट देशावर असताना अशा काळात परिक्षा घेणे खरच आवश्यक आहे का? नेमकं राजकारण करतेय तरी कोण अशा सवाल नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थितीत होत असेल
कोरोना मुळे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि देशातील आयआयटींनी परिक्षा रद्द केल्या आहे.मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वर निशाणा साधत 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पेक्षा राज्यपालांच ज्ञान जास्त',असल्याचा टोला लगावला आहे.