Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १२ जून, २०२०

राज्यातील काॅग्रेस नेते नाराज

राज्यातील काॅग्रेस नेते नाराज


राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले व त्यांनी राज्यात काही महिन्या आधी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं.मात्र यामध्ये काॅग्रेस नेत्यांचा महाविकास आघाडी सरकार मध्ये मन रमत नसल्याने वारंवार नाराजी बोलून दाखवत आहे.

राज्यात लवकरच विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी तिन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागा देण्याचे ठरल्याची माहिती आहे.परंतू नव्या प्रस्तावा मुळे यात शिवसेना ५, राष्ट्रवादी ४ आणि काॅग्रेस ३ जागा देण्याचा फाॅर्म्युला निश्चित झाल्याचे बोलल्या जात आहे.काॅग्रेसने पाच जागेची मागणी करून देखील केवळ तीन जागा पदरी पडत असल्याने काॅग्रेस नेते नाराज झाल्याची माहिती आहे.


काॅग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस या तिन्ही पक्षात विधान परिषदेच्या १२ जागांचे समसमान वाटप झाले पाहिजे आणि विविध महामंडळाच्या नेमणुका सुध्दा सर्वांना समान वापट होण्यासाठी काॅग्रेसचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

काॅग्रेस नेत्यांनी गुरूवारी बैठक घेतली यावेळी सरकारच्या महत्वाच्या निर्णयात काॅग्रेसच्या मंत्र्यांना सहभागी केल्या जात नाही अशी नाराजी बैठकीत बोलून दाखवण्यात आली.राज्यपाल नियुक्तच्या १२ जागांमध्ये अधिकची एक जागा काॅग्रेसला पाहीजे मात्र नवा फाॅर्म्युला समोर आल्याने काॅग्रेसची नाराजी शिवसेना व राष्ट्रवादी च्या नेत्यांना समजावी म्हणुन काॅग्रेसने तातडीने बैठक घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad