मुंबई- जळगाव येथील दवाखान्यातून अचानक बेपत्ता झालेल्या एक ८२ वर्षीय कोरोना बाधित वृद्धेचा मृतदेह तब्बल सहा दिवसा नंतर रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आल्याने या घटनेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणुस म्हणुन विचार केला तर या गोष्टीबदल प्रचंड दुःख आणि संताप वाटतो.राज्य सरकारचा असा ढिसाळ कारभार चालू असताना आपण शांत बसून राहणार नाही,आवाज उठवायला हवा असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटर वर एक पोस्ट अपलोड करून करून त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केले आहे.अपलोड केलेल्या पोस्ट मध्ये चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की,सध्या माध्यमातून दररोज कोरोना संबंधी बातम्या येत आहे.काही सकारात्मक तर काही बातम्या नकारात्मक येत आहे.मात्र माझ्या वाचनात 'जी' बातमी आली ती वाचून माझं मन सुन्न झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.