लवकरच राज्याच्या विधान परिषद मध्ये नामनियुक्त १२ आमदारांना संधी दिल्या जाणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे.यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शेतकरी नेते माजी खासदार राजु शेट्टी यांना विधान परिषदेची ऑफर दिली आहे.
राजु शेट्टी हे या संदर्भात लवकरच आपला निर्णय जाहीर करणार आहे.राजु शेट्टी यांनी ऑफर स्विकारल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत वाढणार एवढे मात्र नक्की
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी यांना राष्ट्रवादी काॅग्रेसनें विधान परिषदेची ऑफर दिली आहे.राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणुन राष्ट्रवादी त्यांच्या कोट्यातून शेट्टींना आमदार करणार आहे.
