गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांनाप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहवेदना व्यक्त केल्या. देश तुमच्या सोबत आहे असा विश्वास मोदी यांनी शहीद जवानांच्या कुटूबीयांना दिला. भारत आपला स्वाभिमान आणि एक इंच जमीनीचे संरक्षण करणार असे सुध्दा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
भारताच्या अंगावर येण्याचा प्रयत्न कराल तर, शिंगावर घेऊ अशा इशारा चीनला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.मोदी यांनी स्पष्ट शब्दात चीनला इशारा दिला आहे. भारत कधीही अखंडतेशी तडजोड करणार नाही. जर आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर देण्यास भारत तयार आहेत. अशा कडक शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला सुनावले आहेत.
गलवान खोऱ्यात सीमेवर झालेल्या जवानांनाप्रती मोदी यांनी सहवेदना व्यक्त करतो असे म्हणत देश आपल्या सोबत आहे असा विश्वास त्यांनी शहीद जवानांच्या कुटूबीयांना दिला. जवानांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला शांती हवी असून आम्हाला कुणी डिवचण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कसे उत्तर द्यायचे हे देखील भारताला माहित आहे असेही देखील मोदी यावेळी म्हणाले.