देशात लोकसंख्याच्या बाबतीत सर्वात मोठा राज्य म्हणुन उत्तर प्रदेशची ओळख आहे.उत्तर प्रदेश सारख्या राज्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यश आल्याने त्यांचे कौतुक पाकिस्तानात केल्या जात आहे.
पाकिस्तान मधिल आघाडीचे वृत्तपत्राचे संपादक 'डाॅन'चे संपादक फहाद हुसैन यांनी उत्तर प्रदेश सरकराने केलेले कोरोना संदर्भातील प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.कोरोनाशी कशा पाकिस्तान संघर्ष करित या बाबत हुसैन यांनी एक दिवसा आधीच लेख लिहिला होता.तद्नंतर ट्विटर व्दारे युपी सरकारचं त्यांनी कौतुक केले आहे.
पाकिस्तानाची लोकसंख्या २०.८ कोटी तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २२.५ कोटी एवढी आहे.मात्र पाकिस्तानात कोरोना रूग्णांची मृत्यूची संख्या उत्तर प्रदेश पेक्षा सात पटाने जास्त असल्याचा दावा पाकिस्तानी वृत्तपत्र'डाॅन'चे संपादक फहाद हुसैन यांनी केला आहे.
उत्तर प्रदेश आणि पाकिस्तान ची लोकसंख्या जवळपास सारखीच आहे.मात्र उत्तर प्रदेश मध्ये लाॅकडाऊन चा ज्या पध्दतीने नियम पाळण्यात आले त्यामुळे सरकारला कोरोना नियंत्रण मिळवता आला.परंतू पाकिस्तान मध्ये कोरोना संदर्भात सरकारने आणि नागरिकांनी गांभीर्याने न घेतल्याने युपी पेक्षा पाकिस्तान ची मृत्यू दर सात पट जास्त असल्याची माहिती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response