Breaking

Post Top Ad

सोमवार, ८ जून, २०२०

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्याने स्वतः खणली विहीर

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्याने स्वतः खणली विहीर

कहते है की,होसला अगर बडा हो तो,बडे से बडा काम किया जा सकता है।,जज्बा और जुनून के बुते बडी चुनोती या पार की जा सकती है।

म्हटलं जातं की, प्रेम म्हणजे सर्वस्व आहे.प्रेमाच्या पलीकडे काहीच नाही.एकदा प्रियसीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. हे जगाने अनुभवल आहे.जगप्रसिद्ध सातवे आश्चर्य म्हणून प्रसिद्ध असणारा ताजमहाल सुद्धा प्रेमाचं प्रतीकच आहे. अनेक प्रियसी आणि प्रियकर येथे येतात आणि प्रेमाच्या आणाभाका घेऊन एक सेल्फी काढून आपल्या घरी परत जातात. आपलं प्रेम घट्ट करतात. शहाजहानने आपल्या लाडक्या पत्नीच्या आठवणीत बांधलेला ताजमहाल जगाला परिचित आहे. आणि तो विश्वातील प्रत्येक माणसाला मोहून टाकते.परंतु अशाच एका प्रेयसीसाठी बावीस वर्ष पर्वताला खोदून रस्ता बनवणारा दशरथ मांझी सुद्धा प्रेमाच्या पलीकडे जाऊन जगामध्ये आश्चर्य निर्माण करणारा आहे. व हे तेवढेच सत्य आहे.
यवतमाळ जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून काढण्याचं धाडस रामदासाने जगासमोर ठेवले त्यामुळे प्रशासन जनता आणि सर्वत्र रामदास आणि त्यांची पत्नीचा कौतुकच केले जाते.

यवतमाळ जिल्ह्या हा शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून परिचित आहे. एकेकाळी यात जिल्ह्यांतील कळंब  नगरीत कापसाचा शोध लागला अशी आख्यायिका आहे.जगात येथूनच कापूस गेला अशा प्रकारे सांगितले जाते. आज मात्र यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्येचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते.त्यामुळे शेतकऱ्यांकडे अवघ्या जगाची नजर लागलेली असते. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यांमध्ये येणाऱ्या लोनबेहळ येथील रामदास पिलावन यांचं प्रेम शेती नावाच्या एका प्रेयसीवर झालं आणि चक्क वैराण असणाऱ्या आपल्या मातेला ओलचिंब करायचं स्वप्न रामदास मी पाहिलं! रामदास नावाचा मजूर आपल्या शेतीला हिरवगार करण्याचे स्वप्न पाहत असतांना दररोज मजुरीचे काम करून मिळालेल्या वेळामध्ये त्याने तीस फूट विहीर खोदली, तेही कुदळ आणि पावडयाने..आज त्या विहिरीला भरपूर पाणी आहे. त्यात विहिरीच्या पाण्यामधून ओलिताची शेती करतो. खरंच रामदासने उराशी असणारे स्वप्न त्याने पूर्ण केलं  ताजमहाल आणी मांझीच्या पर्वतालाही लाजवेल हेच काम त्याने करून दाखवलं.यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये रामदास या बहादुरीचं कौतुक केलं जाते.

Ankush Wakde
अंकुश वाकडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad