देशासह राज्यात गेल्या सत्तर दिवसा पासून कोरोना मुळे लाॅकडाऊन सुरू आहे.अशात पडद्यावर विलनची भुमिका साकारणारा व्यक्ती जिवनाच्या चित्रपटात बाहेरील राज्यातील लोकांच्या मदतीला धावून जात त्यांना घरी पोहचविण्याची सोय करित खरोरखचा हिरो असल्याची जाणिव लोकांना झाल्या नंतर त्या अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षा झाला.
रविवारी शिवसेनेच्या मुख्यपत्र असलेल्या दैनिक सामना मध्ये खासदार संजय राऊत यांनी सोनू सूदवर जहेरी टिका करित 'ठाकरे' सरकारला अपयशी ठरवण्यासाठीच सोनू सूदने पुढे केल्या जात असल्याचे वृत्त सामना मधून प्रकाशीत करण्यात आले होते.
रविवारी उशीरा सोनू सूदने मातोश्रीवर हजेरी लावली आणि मुख्यमंत्र्यांची
भेट घेत सविस्तर चर्चा केली.यावेळी जवळपास आर्धा तास चर्चा मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या सोबत सोनू सूदने केली.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनू सूद यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून शाबासकी दिल्याची चर्चा आहे.सोनू सूदने मातोश्री गाठल्या नंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी"अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला" अशी पोस्ट ट्विटर वर केली .