माणूस Kiss करायला कधी आणि कसा शिकला?

 

संशोधकांनी अखेर शोधले 2 कोटी वर्षांपूर्वीचे सत्य!

मुंबई : पहिल्यांदा किस केलेली आठवण जवळजवळ प्रत्येकाला असते… पण मानवाने किस करायला सुरुवात नेमकी कधी केली? ही कला कोणी शिकवली? प्रेमाची भाषा म्हणावी की नात्याची खात्री करण्याचा मार्ग?  हे कोडं अनेक वर्षांपासून वैज्ञानिकांनाही चक्रावून टाकत होते.

मनुष्य बोलायला, लिहायला आणि विचार करायला शिकला, पण किस करण्याची वेळ कधी आली? उत्तर आता मिळालं आहे आणि ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! संशोधकांच्या निष्कर्षानुसार किस करण्याची सुरुवात प्रेमामुळे नाही तर उत्क्रांतीमुळे झाली… आणि तीही आजपासून नव्हे तर तब्बल 2 कोटी वर्षांपूर्वी! म्हणजे मानवाने बोलायला, विचार करायला किंवा संस्कृती निर्माण करायला शिकण्यापूर्वी किस आधी शिकला होता.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी उत्क्रांतीवरील मोठ्या डेटा-स्टडीद्वारे हा शोध लावला. त्यांनी मानव, चिंपांझी, बोनोबो, गोरिला आणि ओरंगुटान यांचा अभ्यास केला — आणि एक मोठा धागा सापडला: या सर्व प्राण्यांमध्ये चुंबनाचे वर्तन आढळते म्हणजे ही सवय उत्क्रांतीपूर्व पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळालेली आहे

डॉ. मटिल्डा ब्रिंडल यांच्या माहितीनुसार, विशेष सॉफ्टवेअर मॉडेल लाखो वेळा चालवून पाहिल्यानंतर निष्कर्ष नोंदवण्यात आला पहिले चुंबन सुमारे 2.1 कोटी वर्षांपूर्वी झाले असावे आणि दोन्ही वेगवेगळ्या मानव प्रजातींनी एकमेकांना किस केले!

हे निष्कर्ष तिथेच थांबत नाहीत. संशोधकांच्या मते 3 लाख वर्षांपूर्वी उदयास आलेला आधुनिक सेपियन मानव व त्याच काळात जिवंत असलेला निअँडरथल मानव यांनी एकमेकांना लिपलॉक पद्धतीने चुंबन दिले होते अर्थात किस फक्त आपल्या प्रजातीपुरता मर्यादित नव्हता, तर वेगवेगळ्या मानव प्रजातींमध्येही वापरला जात होता.

संशोधनानुसार मानवाने हे वर्तन निवडले कारण…  किस करताना शरीरातील केमिकल्स व हार्मोन्समुळे समोरची व्यक्ती योग्य जोडीदार आहे की नाही हे ठरवणे सोपे होते

जोडीदाराशी जवळीक आणि भावनिक नातं मजबूत करण्यास मदत होत होती यामुळे उत्तेजना तसेचपुनरुत्पादन यश वाढत होते. म्हणजे किस केवळ रोमँस नाही… तर उत्क्रांतीचा यशस्वी सूत्र असल्याचे संशोधनात समोर आले.


-----------------------------------------------------------

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने