‘चॅट’ VIRAL, लग्न पुढे ढकलल्यानंतर नवा वाद!
मुंबई : क्रिकेट स्टार स्मृती मंधाना आणि संगीतकार- फिल्ममेकर पलाश मुच्छल यांच्या लग्नाचा वीकेंड अचानक वादात गुरफटला आहे. सांगलीत 23 नोव्हेंबरला होणारी त्यांची भव्य लग्नसोहळ्याची तयारी कुटुंबाने अचानक स्थगित केली. अधिकृत कारण दिलं स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांची प्रकृती बिघडणे. त्यांना हृदयविकारासारखी लक्षणे दिसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु लग्न पुढे ढकलल्याची घोषणा होताच सोशल मीडियावर नवा स्फोट झाला पलाश मुच्छलवर धोका दिल्याचा दावा करणारी एका महिलेची पोस्ट व्हायरल झाली.
मंगळवारी पहाटेच महिला आणि पलाश यांच्यातील कथित चॅटचे स्क्रीनशॉट समोर आले आणि काही तासांतच रेडिट, इंस्टाग्राम आणि X (ट्विटर) वर मोठा गदारोळ झाला. हे स्क्रीनशॉट्स सर्वात आधी Mary D’Costa नावाच्या इंस्टाग्राम युजरने पोस्ट केले. नंतर ती अकाउंट डिॲक्टिव्ह झाली. या चॅट्सची सत्यता अजूनही तपासण्यात आलेली नाही तसेच इतर माध्यमांनीही ती पुष्टी केलेली नाही.
व्हायरल स्क्रीनशॉट्सनुसार ही कथित चॅट मे 2025 ची असल्याचं म्हटलं जात आहे. यात पलाश एका महिलेला स्विमिंगसाठी इनवाइट करताना दिसत आहे. महिला नात्याबद्दल स्पष्ट विचारत असतानाही पलाश उत्तर चुकवत भेटण्याचा आग्रह करत असल्याचं दिसतं. आणि याच गोष्टीवरून सोशल मीडियावर पलाशवर ‘चीटिंग’चे गंभीर आरोप होत आहेत.
एका रेडिट युजरने लिहिलं, “हे पाहूनच मन सुन्न झालं. लोकांमध्ये लाज-शरम राहिलीच नाही.”
दुसऱ्याने म्हटलं, “मोठमोठ्या जेश्चरने मुलीचा विश्वास जिंकला… आणि मागून चीटिंग!”
तर अनेकांनी हे स्क्रीनशॉट्स एडिटेड असण्याची शक्यता व्यक्त केली. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट सहज बनावट तयार होऊ शकते, म्हणून निष्कर्षांवर उडी मारू नये, असा सल्लाही काहींनी दिला.
काहींनी तर सरळ लिहिलं—“स्मृती एका मोठ्या संकटातून वाचली असेल.”
तर अनेकांनी स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली.
घटनेला आणखी वळण तेव्हा मिळालं, जेव्हा लग्न पुढे ढकलल्याच्या 24 तासांतच स्वतः पलाश मुच्छलची तब्येतही बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आणि नंतर मुंबईला शिफ्ट करण्यात आले. दुसरीकडे फॅन्सनी हेही पाहिलं की स्मृती मंधानाने आपल्या इंस्टाग्रामवरून लग्न आणि एंगेजमेंटशी संबंधित अनेक पोस्ट्स हटवल्या, ज्यात इंगेजमेंट फोटो आणि प्रपोजल व्हिडिओही होते.
या सर्व घडामोडींमुळे संपूर्ण प्रकरण आणखीनच रहस्यमय आणि नाट्यमय बनले आहे. लग्न पुढे ढकलण्यामागे केवळ आरोग्य कारणं आहेत, की काहीतरी अधिक गंभीर गोष्ट दडलेली आहे? सोशल मीडिया प्रश्न विचारत आहे आणि दोन्ही कुटुंबांकडून शांतता पाळली जात आहे. दरम्यान, चाहत्यांमध्ये एकच चर्चा आहे. खरंच पलाश मुच्छलने स्मृती मंधानाला धोका दिला का, की हे सर्व व्हायरल स्क्रीनशॉट्स एक मोठा गैरसमज आहे?
------------------------------------------
.
