नवी दिल्ली : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये तब्बल 2,623 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती उमेदवारांसाठी सुवर्णसंधी मानली जात असून, इच्छुक उमेदवार 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ ongcindia.com, nats.education.gov.in किंवा apprenticeshipindia.gov.in वर जाऊन फॉर्म भरता येईल.
या भरतीअंतर्गत देशभरातील विविध विभागांमध्ये पदे उपलब्ध आहेत. उत्तरी विभागात 165, पश्चिम विभागात 856, मुंबई सेक्टरमध्ये 569, पूर्व विभागात 458, दक्षिण विभागात 322 आणि केंद्रीय विभागात 253 पदे भरली जाणार आहेत.
या पदांसाठी शैक्षणिक पात्रतेत संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा ट्रेड, तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी आवश्यक आहे. उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावे. अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची, ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांसाठी 3 वर्षांची आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड केवळ इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाणार आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र, स्वाक्षरी आणि आवश्यक शुल्कासह फॉर्म पूर्ण करून सबमिट करावा. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट कॉपी स्वतःकडे ठेवणे गरजेचे आहे.
ONGC मधील ही भरती ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा धारकांसाठी मोठी संधी असून, कोणतीही परीक्षा नसल्याने सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी मानली जात आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
