भारताला कॉमनवेल्थ गेम्स 2030 ची मेजबानी !


दोन दशकांनंतर भारतात ऐतिहासिक शताब्दी स्पर्धा

नवी दिल्ली : भारतासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2030 ची मेजबानी अधिकृतपणे भारताला मिळाली असून या सर्वात मोठ्या मल्टी-स्पोर्ट इव्हेंटचे आयोजन अहमदाबाद येथे होणार आहे. भारत या स्पर्धेच्या यजमानपदाच्या रेसमध्ये आधीपासूनच आघाडीवर होता आणि आता ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट जनरल असेंब्लीमध्ये अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे.

दोन दशकांनंतर कॉमनवेल्थ गेम्सची भव्य पुनरागमन भारतात होत असून ही दुसरी वेळ असेल जेव्हा देश या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. यापूर्वी 2010 मध्ये नवी दिल्ली येथे कॉमनवेल्थ गेम्स झाले होते आणि त्या वेळी भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत मेडल टेबलमध्ये दुसरा क्रमांक पटकावला होता.

ग्लासगो येथे झालेल्या जनरल असेंब्लीमध्ये 74 सदस्य राष्ट्रांच्या मतदानानंतर अहमदाबादच्या बाजूने निर्णय झाला. गेल्या महिन्यात कॉमनवेल्थ स्पोर्टच्या एक्झिक्यूटिव्ह बोर्डनेही अहमदाबादला शताब्दी वर्षाच्या विशेष एडिशनसाठी होस्ट म्हणून शिफारस केली होती. हा निर्णय जाहीर होताच भारतीय क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा डॉ. पी. टी. उषा यांनी या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, कॉमनवेल्थ स्पोर्टने भारतावर दाखवलेला विश्वास आमच्यासाठी मोठा सन्मान आहे. 2030 च्या स्पर्धा कॉमनवेल्थ मूव्हमेंटच्या शंभरीचा उत्सव साजरा करण्याबरोबरच आगामी भविष्यासाठी मजबूत पाया घालतील. कॉमनवेल्थमधील सर्व देशांचे खेळाडू, संस्कृती आणि समुदाय यांना मैत्री, प्रगती आणि बंधुत्वाच्या भावनेने एकत्र आणण्याची ही मोठी संधी असेल.

कॉमनवेल्थ स्पोर्टचे अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनीही प्रतिक्रिया देताना याला ‘नव्या सुवर्णयुगाची सुरुवात’ असे संबोधले. त्यांनी सांगितले की 2026 च्या ग्लासगो गेम्सनंतर थेट लक्ष 2030 च्या अहमदाबाद शताब्दी एडिशनवर असेल आणि जगातील 74 कॉमनवेल्थ संघांच्या सहभागात भव्य खेळ सोहळा पाहायला मिळेल.

अहमदाबाद 2030 मध्ये 15 ते 17 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात येणार आहे. athletics आणि para-athletics, swimming आणि para-swimming, table tennis आणि para-table tennis, bowls आणि para-bowls, weightlifting आणि para-powerlifting, artistic gymnastics, netball आणि boxing हे प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित क्रीडा प्रकार अंतिम करण्याची प्रक्रिया पुढील महिन्यापासून सुरु होईल. 

विचाराधीन खेळांमध्ये archery, badminton, 3x3 basketball आणि 3x3 wheelchair basketball, beach volleyball, cricket T20, cycling, diving, hockey, judo, rhythmic gymnastics, rugby sevens, shooting, squash, triathlon आणि paratriathlon, wrestling यांचा समावेश आहे. याशिवाय यजमान देशाला दोन नवीन किंवा पारंपरिक खेळ सुचवण्याची परवानगीही देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारताचा जागतिक क्रीडा नकाशावरचा प्रभाव आणखी बळकट होणार असून 2030 मध्ये अहमदाबादचे नाव जगभर चमकणार हे निश्चित झाले आहे.


------------------------------------------------------------------


 

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने