सर्वपक्षीय नेत्यांची एकजूट विरोधकांसाठी धोक्याची घंटा
वणी (यवतमाळ) : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये उमेदवार अखिल सातोकर आणि अश्विनी खापणे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली रॅली ऐतिहासिक ठरली. अतुलनीय गर्दी, उत्साह आणि सर्ववर्गीय सहभागामुळे ही रॅली केवळ प्रचार मोहीम न ठरता, विजयाचा आधीच झालेला शंखनाद मानला जात आहे.
रस्त्यांवरून उसळलेली लोकांची गर्दी, महिलांचा सक्रिय सहभाग, तरुणांची घोषणाबाजी आणि ज्येष्ठ नागरिकांची जाहीर पाठराखण पाहता संपूर्ण प्रभाग ३ अक्षरशः दणाणून गेला. सातोकर यांच्या नेतृत्वावर असलेला लोकविश्वास प्रत्येक टप्प्यावर स्पष्टपणे जाणवत होता.
या रॅलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनेक मित्रपक्षांचे वरिष्ठ नेते एका व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित पक्षांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, संभाजी ब्रिगेड, भीम आर्मी, इतर मित्रपक्षांचे नेतृत्व…असे नेते सहभागी झाले.
साध्या नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्वपक्षीय समर्थन मिळणे ही प्रभाग ३ मध्ये सातोकर यांच्या विजयाची खात्री सर्वांनी आधीच मान्य केल्याचे प्रतीक मानले जात आहे.
अखिल सातोकर यांची लोकप्रियता पदाने मिळालेली नाही;तर ते कायम लोकांमध्ये राहून, समस्या प्रत्यक्ष जाणून, २४x७ उपलब्ध राहून, संघर्षाच्या वेळी मैदानात उतरूनसातोकर यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. म्हणूनच लोक त्यांना “नेता” म्हणून नव्हे, तर प्रभाग ३ चा स्वतःचा माणूस म्हणून पाहतात.
रॅलीनंतर अखिल सातोकर म्हणाले “आजच्या रॅलीमधून नागरिकांनी दाखवलेला उत्साह ही माझी रॅली नाही… संपूर्ण प्रभाग ३ च्या जनतेची शक्ती आहे. या पाठिंब्याने विजयाची मोहर आधीच लागली आहे.” रॅलीतील प्रचंड गर्दी, सर्वपक्षीय समर्थन आणि उत्स्फूर्त नागरिक सहभाग पाहता प्रभागात एकच चर्चा रंगली “अखिल सातोकर यांचा विजय आता निश्चित!”
निवडणुकीत प्रभाग ३ कोणत्या दिशेने झुकले आहे हे सांगण्यासाठी आता सर्वेक्षण, आकडे किंवा अंदाज लागत नाही. जनतेने सातोकर यांच्यावर ठेवलेला विश्वास मतदानापूर्वीच विजयी लाटेचे चित्र स्पष्ट करून गेला आहे.
वणीतील प्रभाग क्रमांक ३ ची रॅली म्हणजे शक्तिप्रदर्शन नव्हे, विजयाची आधीच झालेली शिक्कामोर्तब घोषणा मानण्यात येत आहे. जनता, पक्ष नेतृत्व आणि सर्वपक्षीय ऐक्य हे तीनही आधार सातोकर यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आहेत, आणि येत्या निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये इतिहास घडण्याची चिन्हे पक्की समजली जात आहेत.
----------

