BJP-JDU सह कोणत्या पक्षाला मिळाल्या किती जागा
पटना : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये अखेर जागा वाटपाचा तिढा सुटला आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर एनडीएतील जागावाटपाचे सूत्र जाहीर केले.
यामध्ये भाजप आणि जनता दल युनायटेड या दोन्ही पक्षांना १०१-१०१ जागा, तर लोक जनशक्ती पार्टी रामविलास ला २९ जागा, राष्ट्र लोक मंच RLM आणि हम Hindustani Awam Morcha या पक्षांना ६-६ जागा देण्यात आल्या आहेत.
धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, एनडीएच्या सर्व सहकाऱ्यांनी परस्पर सहमतीने जागा वाटपाचे काम पूर्ण केले आहे. सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत! बिहार तयार आहे पुन्हा एनडीए सरकार आणण्यासाठी.”
बिहारमध्ये यंदा विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत – ६ आणि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडणार आहेत.
आसनवाटप निश्चित झाल्यानंतर आता एनडीएचे सर्व घटक पक्ष उमेदवार निवड आणि प्रचार मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून एनडीएमध्ये आसनवाटपावरून सतत बैठकांचा आणि चर्चां सुरू होत्या. शेवटी भाजप-जेडीयू यांच्यात समसमान जागा देत तडजोडीचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. छोटे समर्थनात असलेले पक्ष आपल्या-आपल्या मतदारसंघांमध्ये संघटन बळकट करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Which party got how many seats including BJP-JDU