लक्ष्मी पूजनासाठी कोणता दिवस राहणार शुभ
मुंबई : या वर्षी दिवाळीचा सण नेमका २० ऑक्टोबरला की २१ ऑक्टोबरला साजरा करायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण कार्तिक महिन्यातील अमावस्येची तिथी दोन दिवस २० आणि २१ ऑक्टोबरला आहे. मात्र, ज्योतिषाचार्यांच्या मते २० ऑक्टोबरला प्रदोष आणि निषीथ कालाचा शुभ संयोग होत असल्याने लक्ष्मी पूजन आणि दिवाळी साजरी करण्यासाठी हाच दिवस सर्वोत्तम मानला गेला आहे.
ज्योतिषाचार्यांच्या मते, दिवाळी हा रात्रौ साजरा केला जाणारा सण आहे आणि या सणाचे विशेष महत्त्व प्रदोष काल आणि निषीथ कालाशी जोडलेले आहे.
या वर्षी हे दोन्ही शुभ मुहूर्त २० ऑक्टोबरच्या रात्री अमावस्येच्या तिथीसह जुळत आहेत. त्यामुळे २० ऑक्टोबरलाच दिवाळी आणि लक्ष्मी पूजन करणे अत्यंत शुभ राहील असे सांगितले जात आहे.
कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथी २० ऑक्टोबर दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांपासून सुरू होऊन
२१ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत राहणार आहे. मात्र, दिवाळी रात्रौ साजरी केली जाते, त्यामुळे २० ऑक्टोबरच्या रात्री लक्ष्मी पूजन करणे श्रेष्ठ मानले गेले आहे.
मान्यता आहे की प्रदोष काळात लक्ष्मी पूजन केल्यास
मातेचे विशेष आशीर्वाद लाभतात आणि घरात धन-समृद्धीचे आगमन होते. या काळात दीपदान केल्याने नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि सुख-शांतीचा वास होतो.
२० ऑक्टोबरची रात्र ही काली चौदसची रात्र आहे, जी दिवाळीच्या दृष्टीने अत्यंत शुभ मानली जाते. या रात्री दीपदान आणि लक्ष्मी पूजन केल्यास घरात सौख्य, समाधान आणि समृद्धी येते असे तज्ञांचे मत आहे .
Auspicious day for Diwali and Lakshmi Puja
दिवाळी लक्ष्मी पूजनासाठी शुभ दिवस