प्रवाशांसाठी रेल्वेची मोठी घोषणा!
नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच प्रवाशांना तिकिटावरील तारीख बदलण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे प्रवास रद्द करून पुन्हा नवीन तिकीट घेण्याची गरज राहणार नाही.
रेल्वेच्या नव्या सुविधेनुसार, जर तुमच्याकडे १० तारखेचे तिकीट असेल आणि प्रवास २० तारखेला करायचा असेल, तर तुम्ही त्याच तिकिटावर तारीख बदलू शकता. यासाठी तुम्हाला ना तिकीट रद्द करावे लागेल, ना पुन्हा नवे तिकीट बुक करावे लागेल.
आत्तापर्यंतच्या नियमानुसार, प्रवासाची तारीख बदलायची असल्यास तिकीट रद्द करून नवीन तिकीट घ्यावे लागत असे. परंतु यात सीट कन्फर्म मिळेलच याची खात्री नसते, त्यामुळे प्रवाशांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.
प्रवाशांना तिकीटाची तारीख बदलण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. ही सुविधा IRCTC च्या वेबसाईट आणि मोबाइल अॅपवरून उपलब्ध होणार आहे. जर नव्या तारखेला सीट उपलब्ध असेल, तर प्रवाशांना ती नव्या भाड्यानुसार मिळेल. मात्र, सीट कन्फर्मेशन ट्रेनच्या क्षमतेवर आणि कोट्यानुसार ठरेल. ही नवीन प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की,नतिकिटावरील तारीख बदलण्याची ही सुविधा जानेवारी २०२६ पासून लागू केली जाईल. या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.”
प्रवाशांसाठी फायदे
तिकीट रद्द करण्याची गरज नाही
नवीन तिकीट घेण्याचा त्रास नाही
वेळ, पैसे आणि तणावाची बचत
डिजिटल सोयीमुळे प्रक्रिया अधिक सोपी
Indian Railways ticket Date Change
