हॅन्डबॉलला प्रोत्साहनासाठी राज्यमंत्री भोयर यांचा पुढाकार !



 कुंदाताई विजयकर, डॉ. बबनराव तायवाडे यांचाही पाठींबा


नागपूर : हॅन्डबॉलची राजधानी म्हणून ओळख असलेल्या नागपूरमध्ये पहिली हॅन्डबॉल प्रो लिग होणार आहे. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रो लिगच्या लोगोचे अनावरण राज्यमंत्री भोयर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. ते स्वतः हॅन्डबॉपटू राहिलेले आहेत. या खेळाला आता नवी ओळख मिळवून देण्यासाठी भोयर यांच्यासह आजी माजी हॅन्डबॉलपटू सरसावले आहेत. 


हॅन्डबॉल प्रो लिग लोगो अनावरणाच्या नागपुरात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात नागपूरच्या पहिल्या महापौर कुंदाताई विजयकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, एचपीएलचे सीईओ रुपकुमार नायडू, भारताचे माजी कर्णधार आणि आजी माजी हॅन्डबॉलपटू उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री भोयर म्हणाले, मी स्वतः हॅन्डबॉल खेळाडू राहिलेलो आहे. विदर्भ आणि राज्यस्तरापर्यंत या खेळात मी मजल मारली. मात्र त्यानंतर पुढे जाऊ शकलो नाही. पण आता हॅन्डबॉल खेळाडुंसोबत असे होऊ नये. म्हणून या खेळाला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. 


हॅन्डबॉलमध्ये विद्यार्थीदशेत भरपूर खेळाडू असतात. मात्र शिक्षण संपल्यानंतर आपआपल्या कामांत लागल्यानंतर ते खेळाडू याकडे लक्ष देत नाही. याचे कारण म्हणजे या खेळाचा प्रचार आणि प्रसार पाहिजे तसा झालेला नाही. पण आता या खेळाला नावारुपास आणून जास्तीत जास्त खेळाडू सरकारी नोकऱ्यांमध्ये लागले पाहिजे. यासाठी प्रयत्न करणार आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल स्वतः हॅन्डबॉलपटू असू HPL ची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विदर्भातील हॅन्डबॉलपटू गेले पाहिजे. यासाठी HPL हॅन्डबॉल प्रो लिग महत्वाची भूमिका बजावणार आहे, असा विश्वास पंकज भोयर यांनी व्यक्त केला. 


एचपीएलची पहिली आवृत्ती नागपुरातील मानकापूर स्टेडियममध्ये ७ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित केली जाणार आहे. यामध्ये महिलांचे सहा आणि पुरुषांचे सहा संघ सहभागी होतील. प्रत्येक संघात विदर्भातील किमान चार खेळाडू आणि परदेशी दोन खेळाडू असतील. ५२ लाख रुपयांची एकूण बक्षीसे देण्यात येतील. संघांचा लिलाव ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला होईल. विदर्भ जिल्हा हॅन्डबॉल असोसिएशन आणि एन-कॅश इव्हेंट्स व खेल सेना मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन केले जाईल, अशी माहिती रुपकुमार नायडू यांनी दिली.


Minister of State Bhoyar's initiative to promote!



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने